महिला आरक्षणामुळे प्रस्थापितांची अडचण
By Admin | Updated: October 16, 2015 22:09 IST2015-10-16T22:06:19+5:302015-10-16T22:09:40+5:30
देवळा : नगरपंचायत निवडणुकीत घरच्यांना उमेदवारी

महिला आरक्षणामुळे प्रस्थापितांची अडचण
देवळा : नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरा वर्षांनंतर प्रथमच १७ जागांपैकी १३ जागा सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिलांना ५१ टक्के आरक्षण मिळाल्याने राजकारणी मंडळींना त्यांच्या प्रभागांत अडचण निर्माण झाली असून, त्यांनी आपला मोर्चा इतरत्र सोयीच्या प्रभागांत वळविला आहे. बहुसंख्य राजकीय मंडळींच्या घरातील काही मंडळी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे.
देवळा नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १०९ उमेदवार रिंगणात असून, ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. एकूण ४६ महिला या प्रभागांतून उमेदवारी करीत आहेत. यापैकी ३० महिला राजकारणी मंडळींच्या घरातीलच असून, अपवाद सोडल्या तर उर्वरित महिला प्रथमच उमेदवारी करीत आहेत. या निवडणुकीत आपल्या घरातील महिलांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक अहेर यांच्या पत्नी व माजी जि. प. सदस्य भारती अहेर, माजी उपसरपंच जितेंद्र अहेर यांच्या पत्नी व माजी उपसरपंच सुलभा अहेर, माजी ग्रामपालिका सदस्य उदयकुमार अहेर यांच्या पत्नी अश्विनी अहेर, माजी उपसरपंच दयाराम अहेर यांच्या पत्नी सुनंदा अहेर, माजी सरपंच संतोष अहेर यांची स्रुषा सुरेखा अहेर, माजी सरपंच दिनकर अहेर यांची स्नुषा अनुजा अहेर, माजी सरपंच उत्तम अहेर यांची स्नुषा सरला अहेर, माजी सरपंच अनिल अहेर यांची स्नुषा दीप्ती अहेर, माजी सरपंच रामभाऊ अहेर यांची स्नुषा सुरेखा अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ. दादाजी अहेर यांची स्नुषा मीना अहेर, बाजार समितीचे संचालक प्रदीप अहेर यांची पत्नी सिंधू अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य रघू नवरे यांची पत्नी बेबी नवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य उल्हास गुजरे यांची पत्नी मनीषा गुजरे, माजी ग्रामपंचायत सदस्य कौतिक हिरे यांची पत्नी शकुंतला हिरे, माजी सरपंच परशराम अहेर यांची पत्नी वत्सला अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय अहेर यांची पत्नी ज्योत्स्रा अहेर, माजी सरपंच अशोक अहेर यांची भावजई मंगला अहेर, मधुकर पांडुरंग पतसंस्थेचे चेअरमन संतोष शिंदे यांची पत्नी वनीता शिंदे, माजी सरपंच पुंडलीक अहेर यांची स्नुषा वृषाली अहेर, दाजी पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष दिलीप अहेर यांची पत्नी शीला अहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य संगीता गांगुर्डे, माजी सदस्य पुष्पा गुजरे, सुरेखा अहेर, सरला गांगुर्डे आदि उमेदवारी करीत आहेत. तसेच ललिता भामरे, चित्रा अहेर, निर्मला अहेर, गीता अहेर, सोनाली अहेर, सिंधू अहेर, सुनीता पवार, मनीषा अहेर, सुरेखा अहेर, यशोमती गुजरे, कलाबाई पवार, अर्चना पवार, शीतल वाघ, पद्मा पवार, पल्लवी अहेर, विजया हिरे, जया अहेर, शोभा अहेर, मंगला अहेर आदि महिला रिंगणात आहेत. (वार्ताहर)
सध्या जरी सर्वत्र उमेदवारी करणाऱ्या महिलांची चर्चा असली तरी खरे चित्र सोमवारी (दि. १९) माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. किती महिला निवडणूक लढवतील हा चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)