मजुरांच्या टंचाईने निंदणी करण्यात अडचण
By Admin | Updated: August 8, 2016 23:11 IST2016-08-08T23:11:14+5:302016-08-08T23:11:32+5:30
मजुरांच्या टंचाईने निंदणी करण्यात अडचण

मजुरांच्या टंचाईने निंदणी करण्यात अडचण
पिंपळगाव वाखारी : परिसरात मजुरांच्या टंचाईमुळे खरिपाच्या पिकांची निंदणी करणे शेतकऱ्यांना अवघड झाल्याने बाजरी व मका पिकांवर तणनाशकांची फवारणी करणे यावर्षी शेतकरी पसंत करत आहेत. त्यामुळे तणनाशकांची मागणी वाढली असून, शेतकऱ्यांना मजूर टंचाईतून दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामात दरवर्षी शेतकऱ्यांना मजूर टंचाईचे संकट असते. वेळेवर मजूर न मिळाल्याने निंदणी न झाल्यास पिकांची वाढ खुंटते. परिणामी उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. शिवाय मजुरी भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांना मजुरी परवडेनाशी झाली आहे. (वार्ताहर)