मसगा महाविद्यालय चौकातील रोहित्रामुळे अडचण
By Admin | Updated: October 29, 2015 22:13 IST2015-10-29T22:12:32+5:302015-10-29T22:13:14+5:30
मसगा महाविद्यालय चौकातील रोहित्रामुळे अडचण

मसगा महाविद्यालय चौकातील रोहित्रामुळे अडचण
मालेगाव : येथील मसगा महाविद्यालयाच्या चौकात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या रोहित्रामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत असून, हे रोहित्र हटविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
येथील महाविद्यालयीन चौकात पूर्वीपासून वीज वितरण कंपनीने रोहित्र बसविले आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले हे रोहित्र काळाच्या ओघात रस्ता रुंदीकरणामुळे अडचणीचे ठरत आहे. संबंधित रोहित्रामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद होतो. त्यामुळे वाहनधारकांना अडचणी निर्माण होऊन प्रसंगी अपघात घडतात. त्यामुळे अनेकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे.
या भागात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच या रस्त्यावरून अवजड वाहने जा-ये करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. रोहित्रासमोरील व्यापारी संकुलात होणारी गर्दी वाहतुकीला अडचण निर्माण करते. सदर रोहित्र हटविण्यात यावे,
अशी मागणी तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)