शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

नाशकात वाहतुकीची समस्या मोठी, सुविधांवर भर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:08 IST

मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण : नाशिक शहरात विकासाला मोठा वाव

ठळक मुद्देपायाभूत सुविधा वाढविल्या तर मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेलआयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली

नाशिक - नाशिक शहरात विकासाला मोठा वाव असून पायाभूत सुविधा वाढविल्या तर मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. शहरात वाहतूकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजता ते आपला पदभार नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपुर्द करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक कृष्ण यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकीर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. कृष्ण यांनी सांगितले, जुलै २०१६ मध्ये महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम  हरित लवादापुढ सक्षमपणे बाजू मांडल्याने शहरातील रखडलेल्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली निघाला. याशिवाय, खतप्रकल्प, घंटागाडी हे प्रलंबित विषयही मार्गी लागले. वृक्षगणनेचे काम मार्गी लागल्याने महापालिकेला आता आपली बाजू न्यायालयापुढे मांडता येणार आहे, परिणामी न्यायालयाने टाकलेल्या निर्बंधात शिथिलता मिळू शकते. मालमत्ता सर्वेक्षणामुळे नवीन ६७ हजार मिळकती सापडून उत्पन्नात भर पडणार आहे. अमृत योजनेंतर्गत गंगापूर आणि पिंपळगाव खांब एसटीपीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच तवली फाटा व जेलरोड, दसक येथील उद्यानाचे काम झाले आहे. मुकणे पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रोजेक्ट गोदा, स्मार्ट रोड, वॉटर आॅडिटच्या माध्यमातून स्काडा मीटर सिस्टम आदी प्रकल्पही होणार आहेत. महापालिकेत नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित झाले आहेत. नगररचना विभागात आॅटो डिसीआर प्रणाली कार्यान्वित होऊ शकली. गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करत गोदाघाटावरील स्वच्छतेबाबत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. नाशिक शहरात विकासाच्या भरपूर संधी आहेत. शहरात वाहतुक सुविधांवर अधिक काम करणे आवश्यक आहे. ट्रॅफिक सिग्नल व पार्कींगचा प्रश्न निकाली काढणे महत्वाचे असल्याचेही कृष्ण यांनी सांगितले. शहर बससेवा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळाली नसल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.स्वच्छ सर्वेक्षणाबाबत आशावादीकेंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने महापालिकेने स्वच्छतेसंबंधी प्रभावी उपाययोजना राबविल्याचेही अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा पहिल्या ३० क्रमांकामध्ये नाशिकचा नंबर लागण्याबाबतची खात्रीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवता आले, याबाबत कृष्ण यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका