कळवण, देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:12+5:302021-05-19T04:14:12+5:30

कळवण : चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे कळवण व देवळा तालुक्यासाठी बिगर सिंचनासाठी ८० क्युसेकने आज पाणी सोडण्यात ...

The problem of drinking water in Kalvan, Deola taluka will be solved | कळवण, देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

कळवण, देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Next

कळवण : चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे कळवण व देवळा तालुक्यासाठी बिगर सिंचनासाठी ८० क्युसेकने आज पाणी सोडण्यात आले. कळवण तालुक्यातील भेंडी आणि मानूर गावासाठी पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. कालव्याला पाणी सोडल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या निमित्ताने सुटण्यास मदत होणार आहे.

आमदार नितीन पवार यांनी चणकापूर प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडून कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली होती. उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे आमदार पवार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आमदार पवार यांच्या मागणीनुसार जिल्ह्याधिकारी मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यानंतर १२ मे २०२१ रोजी पाटबंधारे विभागाने अहवाल सादर करून २०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात नमूद केल्याने १७ मे २०२१ रोजी गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले.

---------------------------

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चणकापूर धरणातून लाभक्षेत्रातील पिण्याच्या पाण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यासाठी व रामेश्वर लघु पाटबंधारे प्रकल्पापर्यंत २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गिरणा नदी खोरे विभागाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर पाणी सोडण्याची कार्यवाही केली. कालव्यातून पाणी चोरी होणार नाही यासाठी कोल्हापूर फाटा आणि देवळा येथील कालवा उपविभागाची यंत्रणा लक्ष ठेवून राहणार असून, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कालव्यावर तैनात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. उजव्या कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

---------------

या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार

चणकापूर, दत्तनगर, भगुर्डी, अभोणा, वंजारी, दह्याणे, पाळे, विठेवाडी, सावकी, कळमथे, पाळे , मानूर, साकोरे, जिरवाडे, भुसणी, कळवण खुर्द, मानूर, कळवण, नवीबेज, भेंडी, निवाने, वरवंडी, भऊर, विठेवाडी, वरवंडी रामेश्वर, मटाणे, माळवाडी, वाजगाव, सुभाषनगर, पिंपळगाव, वाखारी, गुंजाळनगर, झिरेपिंपळ, फुले माळवाडी, खालप, मकरंदवाडी आदी कळवण व देवळा तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार आहे.

Web Title: The problem of drinking water in Kalvan, Deola taluka will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.