लक्षवेधी बैलजोडीला हजाराचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST2021-09-07T04:19:33+5:302021-09-07T04:19:33+5:30

दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास शेतकऱ्यांनी गावातील हनुमान मंदिराला सर्जा - राजाची ढोलताशांच्या गजरात प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी ...

A prize of a thousand for a pair of eye-catching bulls | लक्षवेधी बैलजोडीला हजाराचे बक्षीस

लक्षवेधी बैलजोडीला हजाराचे बक्षीस

दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास शेतकऱ्यांनी गावातील हनुमान मंदिराला सर्जा - राजाची ढोलताशांच्या गजरात प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी सजावट करण्यात आलेल्या लक्षवेधी बैलजोडीची श्रीराम मित्र मंडळाने निवड केली. हा सोहळा बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

यंदाच्या हंगामात सर्वत्र समाधानकारक पाऊस वेळेवर झाल्याने व शेतीची कामे लक्षात घेता खेड्या-पाड्यासह ग्रामीण भागात उत्साह दिसून आला. सोहळा यशस्वीतेसाठी श्रीराम फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष रोशन शेलार, उपाध्यक्ष आबा शेलार, कैलास बच्छाव, जनार्दन शेलार, सुरेश वाघ, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

०६ जुनी शेमळी)

जुनी शेमळी येथील संजय हिरे यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचे एक हजाराचे बक्षीस देताना श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी. समवेत ग्रामस्थ.

060921\06nsk_41_06092021_13.jpg

जुनी शेमळी येथील संजय हिरे यांच्या बैल जोडीला प्रथम क्रमांकाचे एक हजाराचे बक्षीस देताना श्रीराम मित्र मंडळाचे पदाधिकारी. समवेत ग्रामस्थ.

Web Title: A prize of a thousand for a pair of eye-catching bulls