जलतरण तलावांचेही खासगीकरण

By Admin | Updated: April 2, 2017 01:24 IST2017-04-02T01:24:08+5:302017-04-02T01:24:21+5:30

नाशिक : महापालिकेने आता चार जलतरण तलावांचेही खासगीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे

Privateization of Swimming Pools | जलतरण तलावांचेही खासगीकरण

जलतरण तलावांचेही खासगीकरण

 नाशिक : दिवसेंदिवस महापालिकेची आर्थिक प्रकृती खालावत असल्याने अनेक प्रकल्प स्वनिधीतून चालविणे अवघड होऊन बसले आहे. महापालिकेने आता चार जलतरण तलावांचेही खासगीकरण करण्याचा विचार सुरू केला असून, तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिले आहेत.
शहरात महापालिकेने नाशिक पश्चिम विभागातील वीर सावरकर तरणतलाव, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरणतलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरणतलाव आणि पंचवटीतील श्रीकांत ठाकरे तरणतलाव साकारले आहेत. सदर जलतरण तलावांचा शहरातील असंख्य नागरिक आणि जलतरणपटू लाभ घेत आहेत. महापालिकेच्या वतीने सदर जलतरण तलावांसाठी वार्षिक शुल्क आकारणी केली जाते. मात्र, जलतरण तलावांपासून महापालिकेला सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास उत्पन्न प्राप्त होत असले तरी खर्च मात्र त्याच्या दुप्पट आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती खर्चासाठी महापालिकेला स्वनिधीचा वापर करावा लागतो. (प्रतिनिधी)

Web Title: Privateization of Swimming Pools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.