खासगी वाहनांची बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी
By Admin | Updated: August 7, 2015 23:21 IST2015-08-07T23:20:28+5:302015-08-07T23:21:03+5:30
खासगी वाहनांची बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी

खासगी वाहनांची बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी
खासगी वाहनांची बॉम्बशोधक पथकाकडून पाहणीनाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी कारवाईची शक्यता लक्षात घेऊन बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच भद्रकाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवित शुक्रवारी सायंकाळी द्वारका परिसरात नाशिक वाहनांची कसून तपासणी केली़
सिंहस्थ कुंभमेळ्यास ध्वजारोहणानंतर सुरुवात झाली असून, देशातील काही भागांत घडलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, बीडीडीसएचे आनंदा वाघ, डॉग युनिटचे पोलीस निरीक्षक यांनी शुक्रवारी सायंकाळी द्वारका परिसरात वाहनांची तपासणी केली़
या भागातून जाणाऱ्या कार, खासगी बसेस तसेच इतर संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात आली़ या कारवाईमध्ये भद्रकाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चव्हाण, बीडीडीएसचे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम जमादार, एस़ सी़ कासार, पोलीस उपनिरीक्षक जी़ एम़ पोरजे, पोलीस नाईक जी़ पी़ हिरे, एस़ सी़ फुलपगारे, पोलीस नाईक डी़ एच़ देवरे यांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)