खासगी वाहनचालकांची चांदी
By Admin | Updated: November 16, 2015 00:36 IST2015-11-16T00:35:59+5:302015-11-16T00:36:33+5:30
सासुरवाशिणी परतू लागल्या : एसटीच्या भाडेवाढीने भुर्दंड

खासगी वाहनचालकांची चांदी
खामखेडा : दिवाळीतील भाऊबिजेचा सण आटोपल्याने सणाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या सासुरवाशिणी आपल्या मुलाबाळांसह सासरी परतू लागल्या आहेत.
ऐन दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने अचानक काही दिवसापुरते भाड वाढ केल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागामध्ये बस गाड्याचे प्रमाण कमी असल्याने व रिक्षाचे भाडे कमी असल्याने रिक्षावाल्याचा धंदा तेजीत आहे. रिक्षा येताच तिच्यात बसन्यासाठी जागा मिळविण्यासाठी महिलांची लगबग दिसून येते. बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
पूर्वी दळणवळणाचे साधने नव्हती. तालुक्याच्या गावाहून गावी येण्यासाठी मोजक्या दोन-तीन एस टी आसायच्या. दिवाळी चार दिवस पुढे आसायची तेव्हा सासूरवाशिणी यायच्या आणि दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या एकादशीनंतर पुन्हा सासरी जात असे.
पूर्वी दिवाळी सण वाड्यातील वडील माणसाच्या घरी सर्व एकत्र जमा होऊन साजरा केला जात असे. जमलेले सर्व माणसे प्रत्येकाच्या घरी दिवाळीचे फराळ खाण्यासाठी जात असे. याच्यातून विचारविनिमय होत असे. एकमेकांबदल आपुलकी निर्माण होत असे. परंतु आता परिस्थिति बदलली आहे. दळणवळणाची साधने वाढली आहेत. उधोग-धंदे वाढली आहेत. प्रत्येकामागे कामाचा व्याप वाढला आहे. प्रत्येकाकडे दोन-चार चाकी वाहने उपलब्ध आहेत. त्यामुळे आता दिवाळीच्या एक दिवस आधी किंवा दिवाळीच्या दिवसी येऊन सण साजरा करून सायंकाळी पुन्हा आपापल्या घराकडे जाऊ लागले आहे. (वार्ताहर)