कैद्याच्या मृत्यूची चौकशी

By Admin | Updated: September 16, 2016 23:54 IST2016-09-16T23:54:43+5:302016-09-16T23:54:54+5:30

कैद्याच्या मृत्यूची चौकशी

Prisoner's death inquiry | कैद्याच्या मृत्यूची चौकशी

कैद्याच्या मृत्यूची चौकशी

नाशिक : नाशिकरोड कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना मरण पावलेल्या सर्जेराव किसन काळे या कैद्याच्या मृत्यूची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असून, त्या संदर्भात अधिक माहिती वा हरकत असल्यास त्यांनी येवला प्रांत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ७ जानेवारी २०१५ रोजी सर्जेराव काळे यास औरंगाबाद कारागृहातून नाशिकरोड कारागृहात शिक्षेसाठी दाखल करण्यात आले होते. २ जुलै रोजी वैद्यकीय उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. याबाबत कोणास काही माहिती द्यायची झाल्यास त्यांनी येवला उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष, पत्र वा दूरध्वनीद्वारे द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prisoner's death inquiry