कैद्यांची पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 23:58 IST2016-07-01T23:42:02+5:302016-07-01T23:58:45+5:30

गुन्हा दाखल : किरकोळ कारणावरून घातली हुज्जत

Prisoners beat the police | कैद्यांची पोलिसांना मारहाण

कैद्यांची पोलिसांना मारहाण

नाशिकरोड : न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून कैदी घेऊन जाणाऱ्या पोलिसांना कैद्यांनीच मारहाण केल्याची घटना घडली. दुहेरी हत्त्याकांडातील पाच संशयितांना शुक्रवारी सकाळी पोलीस कैदी पार्टी कारागृहातून न्यायालयीन कामकाजासाठी घेऊन जात असताना गाडीमध्ये बसण्याच्या कारणावरून कैद्यांनी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगार अर्जून उर्फ वाट्या महेश आव्हाड व निखिल विलास गवळे यांचा खून करून त्र्यंबकेश्वरच्या तोरंगण घाटात त्यांचे मृतदेह फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित प्रिन्स चित्रसेन सिंग, सन्नी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर, निखिल मधुकर निकुंभ, वतन शिवाजी पवार, किशोर सुखदेव गायकवाड या पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर नाशिकरोड कारागृहात ठेवण्यात आले होते.
कैदी पार्टीच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांची सुटका करीत कैद्यांना गाडीतूनच नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी दुहेरी हत्त्याकांडातील पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prisoners beat the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.