बलात्कार प्रकरणी आरोपीस कारावास

By Admin | Updated: January 21, 2017 22:55 IST2017-01-21T22:55:28+5:302017-01-21T22:55:44+5:30

वडनेर भैरव येथील घटना : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

Prisoner imprisonment in rape case | बलात्कार प्रकरणी आरोपीस कारावास

बलात्कार प्रकरणी आरोपीस कारावास

निफाड : चांदवड तालुक्यातील नवापूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी चिंतामण पोपट गांगुर्डे यास जिल्हा व  सत्र न्यायालयाचे न्यायाधीश  आर. एस. घाटपांडे यांनी सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.  याबाबत पीडितेच्या वडिलांनी ५ डिसेंबर २०१० रोजी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, सोळावर्षीय अल्पवयीन मुलगी २२ नोव्हेंबर २०१० रोजी दहावीचा फेरपरीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी नवापूर शिवारातून चिखलआंबे फाट्यावरील शाळेत गेली होती. मात्र ती घरी परत आली नाही. म्हणून २७ नोव्हेंबर २०१० रोजी मुलगी हरविल्याची तक्र ार नोंदविली. याच दरम्यान स्थानिक चिंतामण पोपट गांगुर्डे हादेखील गावात दिसत नसल्याने त्यानेच मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. अधिक तपास केला असता तो सांगवी (जि. धुळे) येथील नातेवाइकांकडे असल्याचे समजले. तेथे जाऊन खात्री केली असता चिंतामण गांगुर्डेसह अल्पवयीन मुलगीदेखील तेथे मिळून आली. चिंतामणने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती या अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली. त्यावरुन गांगुर्डेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.  सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून गांगुर्डेविरुद्ध निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सरकार पक्षातर्फेसहायक जिल्हा सरकारी वकील व्ही. एन. हाडपे यांनी एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरु न गांगुर्डे यास भादंवि कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अधिक कारावास, भादंवि कलम ३६६ (अ) नुसार पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अधिक कारावास, ३७६ (अ) नुसार सात वर्षे सश्रम कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास चार महिने अधिक कारावास, अशी शिक्षा सुनावली असून, सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Prisoner imprisonment in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.