शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याचा कारागृहात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 01:34 IST

मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने खिडकीच्या गजाला फाडलेली चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नाशिकरोड : मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने खिडकीच्या गजाला फाडलेली चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी सुनील भानुदास बोरसे 40 हा गेल्या काही दिवसापासून कंटाळला होता. परिणामी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुनील याने कारागृहातील मंडल क्रमांक मधील बॅरेक क्रमांक पाच च्या जिन्याने वर शौचालयाच्या छतावर जाऊन चादर फाडून त्याची दोरी बनवून खिडकीच्या गजाला बांधुन गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या कैद्यांच्या तत्काळ सदर घटना लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लटकलेल्या सुनील बोरसे याला पकडून धरत कैद्यांनी खिडकीच्या गजाला बांधलेली सादर तत्काळ खोलली. त्यामुळे सुनील फास बसल्याने त्याला श्वास घेणे त्रासाचे होऊ लागले. सदर घटना कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी यांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अस्वस्थ व जखमी सुनील याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. कैद्यांच्या जागृकपणामुळे सुनीलचा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी झाला. याबाबत कारागृहाचे कर्मचारी शेख युनूस सांडू यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी