बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By Admin | Updated: January 7, 2016 22:33 IST2016-01-07T22:27:05+5:302016-01-07T22:33:09+5:30
बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप
मालेगाव : बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथे गेल्या चार वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी विजय सुदाम वाघ (२१) रा. वाघळे, ता. बागलाण यास जन्मठेप, सव्वा दोन लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी कारावास अशी शिक्षा अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीष गाडगे यांनी ठोठावली.
बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आनंदपूर येथे १८ डिसेंबर २०११ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. १० वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आजोबांचा डबा देण्यासाठी शेतात जात असताना आरोपी विजय सुदाम वाघ याने नदीपात्रात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक प्रज्ञा जेडगे यांच्याकडे तपास होता. याप्रकरणी दहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोप सिद्ध झाल्याने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडातील २ लाख रुपये पीडितेस द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे किशोर राकावत यांनी काम पाहिले.