संचित रजेवरील कैदी फरार

By Admin | Updated: June 12, 2014 01:23 IST2014-06-12T01:11:37+5:302014-06-12T01:23:31+5:30

संचित रजेवरील कैदी फरार

Prisoner on accumulated leave absconded | संचित रजेवरील कैदी फरार

संचित रजेवरील कैदी फरार


नाशिक : नाशिकरोड कारागृहातून संचित रजेवर सुटलेला कैदी सुनील लक्ष्मण घोडे (रा. रेणुकानगर, वडाळानाका) हा फरार झाला असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी घोडे यास गेल्या फेब्रुवारी महिन्यात संचित रजेची परवानगी मिळाली होती. त्यानुसार तो ६ फेब्रुवारीपासून संचित रजेवर होता. रजा संपल्यानंतर म्हणजे तीस दिवसांनंतर तो कारागृहात परतणे अपेक्षित होते; परंतु तो अद्यापही परतला नसल्याने त्यास पोलिसांनी फरार घोषित केले आहे. या प्रकरणी येथील कारागृह रक्षकाने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Prisoner on accumulated leave absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.