एक तुरुंगात, बाकी वाटेवर
By Admin | Updated: June 7, 2017 00:16 IST2017-06-07T00:16:05+5:302017-06-07T00:16:50+5:30
प्रकाश जावडेकर : मेळाव्यात केले सूचक वक्तव्य

एक तुरुंगात, बाकी वाटेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यात व केंद्र सरकारमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर आली. बेनामी मालमत्तेचा कायदा केल्यानंतर आता कॉँग्रेसचे नेत्एक तुरुंगात, बाकी वाटेवरप्रकाश जावडेकर : मेळाव्यात केले सूचक वक्तव्यो आरोप करीत आहेत. मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांचे दिवस संपलेत. त्यांना कर्माची फळे भोगावीच लागतील, एक तुरुंगात असून, बाकी वाटेवर आहेत, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
सिंचन घोटाळ्यात यापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरेंवर ठपका ठेवण्यात आला असून, प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे तूर्तास तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर कोणाचा नंबर लागतो, अशी चर्चा त्यामुळे उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांमध्ये होती. कॉँग्रेस सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार व घोटाळे झाले असून, कॉँग्रेसनेच बेनामी मालमत्ता संदर्भात कायदा केला. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. भाजपाने या कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. टूजी घोटाळा, पाणडुबी घोटाळा यांसह अनेक घोटाळे झाले. मात्र भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणाऱ्यांचे दिवस संपले. प्रामाणिक सरकार व जनतेच्या अपेक्षांचे विश्वासात रूपांतर झालेले सरकार आल्याने चांगले दिवस आले आहेत. भ्रष्टाचारामुळे एक तुरुंगात आहे, बाकी तुरुंगाच्या वाटेवर आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्या व देशाच्या अप्रामाणिक राहणाऱ्यांना भाजपा कदापी माफ करणार नाही, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. राज्यात १५ वर्षे केवळ कॉँग्रेस व राष्ट्रवादीने लूट केली. कॉँग्रेस ईडीच्या छाप्यांमुळे आरोप करीत आहे. मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांची जागा जेलमध्ये आहे. केलेले लपणार नाही. सर्वांची बेनामी संपत्ती बाहेर येईल. प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्यामुळे आता तुरुंगाच्या वाटेवर नेमके कोण आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.
बिळे बंद केली
कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील पुढाऱ्यांनी त्यांचा काळा पैसा सिंगापूर, सायप्रस व मॉरिशसमार्गे पुन्हा भारतात आणून पांढरा केला. नाशिकचे उदाहरण तुम्हाला चांगलेच माहीत आहे. मात्र पैसा पांढरा करण्याच्या या पळवाटा व बिळे भाजपा सरकारने बंद केली आहे. विविध देशांशी करार करून हा पैसा भारतात येण्याचे मार्ग आम्ही बंद केल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.