स्वच्छता अभियानाला प्राधान्य

By Admin | Updated: October 5, 2015 22:45 IST2015-10-05T22:44:04+5:302015-10-05T22:45:12+5:30

पाथरे : ग्रामसभेतील महत्त्वपूर्ण निर्णय

Priority to cleanliness campaign | स्वच्छता अभियानाला प्राधान्य

स्वच्छता अभियानाला प्राधान्य

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द, पाथरे बुद्रूक व वारेगाव येथे झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
पाथरे बुद्रूकची ग्रामसभा सरपंच मच्छिंद्र चिने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्राम स्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, विविध शासकीय योजना, स्मार्ट व्हिलेज आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपसरपंच सविता नरोडे, शरद नरोडे, अनिल चिने, सुनीता रहाटळ, सुनीता थोरात, बाळासाहेब गायकर, वनिता माळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक नरोडे, पोलीसपाटील वाल्मीक कडवे, प्रमोद नरोडे, संपत चिने, चंद्रकांत चिने, भाऊसाहेब नरोडे, साहेबराव चिने, ग्रामसेवक एस. जी. धालपे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाथरे खुर्दच्या ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ललिता डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, ग्रामस्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, सर्वंकष सहभाग नियोजन प्रक्रिया भाग २ सह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत
चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामसेवक गोविंद मोरे, पशुवैद्यकीय अधिकारी आर. एल. पगार, उपसरपंच सुकदेव गुंजाळ, जगन मोकळ, रवींद्र चिने, छाया चिने, जयश्री चिने, राजेंद्र शिनारे, कविता गुंजाळ, मंगल बेंडकुळे, सी. एम. गुंजाळ, रामनाथ चिने, भाऊसाहेब चिने, सुभाष मोकळ आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वारेगाव येथे सरपंच मीननाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, सर्वंकष सहभाग नियोजन प्रक्रिया या विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच सुनीता वाणी, सोमनाथ घोलप, सतीश जोर्वेकर, मुक्ता खळदकर, सतीश जोर्वेकर, जया दवंगे, अर्चना सोमवंशी, पोलीसपाटील सुभाष बैरागी आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Priority to cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.