लोकसभा निकालापूर्वीच राज ठाकरेंकडून ऑडिट विधानसभेची तयारी: पालिकेच्या कामगिरीचा पंचनामा

By Admin | Updated: May 10, 2014 23:52 IST2014-05-10T22:08:00+5:302014-05-10T23:52:36+5:30

नाशिक : महापालिकेत सत्ता मिळूनही नागरिकांना अपेक्षित कामे होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे. नाशिक येथे आज प्रत्येक नगरसेवकांशी इन कॅमेरा चर्चा करतानाच त्यांनी लोकसभेतील परिस्थितीबरोबरच पालिकेत सत्ता असताना कोठे कमी पडतोय याविषयी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. इतकेच नव्हेतर महापौर आणि आमदारांच्या कामगिरीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे.

Prior to Lok Sabha elections, Raj Thackeray is preparing for the state assembly elections: Panchnikham performance of the corporation | लोकसभा निकालापूर्वीच राज ठाकरेंकडून ऑडिट विधानसभेची तयारी: पालिकेच्या कामगिरीचा पंचनामा

लोकसभा निकालापूर्वीच राज ठाकरेंकडून ऑडिट विधानसभेची तयारी: पालिकेच्या कामगिरीचा पंचनामा

नाशिक : महापालिकेत सत्ता मिळूनही नागरिकांना अपेक्षित कामे होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे. नाशिक येथे आज प्रत्येक नगरसेवकांशी इन कॅमेरा चर्चा करतानाच त्यांनी लोकसभेतील परिस्थितीबरोबरच पालिकेत सत्ता असताना कोठे कमी पडतोय याविषयी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. इतकेच नव्हेतर महापौर आणि आमदारांच्या कामगिरीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे.
राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर नाशिककरांनी त्यांना भरभरून साथ दिली आणि महापालिकेची सत्ताही दिली. तथापि, गेल्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत नागरिकांचे समाधान होऊ शकेल अशा पद्धतीने काम होऊ न शकल्याने लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरल्याने आणि राज्यात अन्य ठिकाणी या मुद्याची चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या कामगिरीवरच अनुकूल किंवा प्रतिकूल कौल मिळण्याची शक्यता असल्याने राज ठाकरे यांनी पुन्हा नाशिकमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी अचानक नाशिक दौरा आखला आणि शनिवारी राजगड येथे लोकसभा निवडणुकीतील आढाव्याबरोबरच पालिकेतील कामगिरीची माहिती घेऊन एकप्रकारे पंचनामाच केला. लोकसभा निवडणुकीतील टीका विधानसभेच्या निवडणुकीतदेखील होऊ नये यासाठीच दक्षता घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
पालिकेतील ३९ पैकी ३७ नगरसेवकांशी एकावेळी एकच अशी चर्चा राज ठाकरे यांनी केली. पालिकेत कामे होतात काय, तुमच्य प्रभागात किती कामे झाली? किती कामे मंजूर आहेत, कामे झाली असतील तर त्याबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचली काय, असे प्रश्न करताना दहा कोटी, वीस कोटी रुपयांची कामे झाली असे सांगणार्‍या नगरसेवकांकडून सायंकाळपर्यंत कामांच्या याद्याही मागविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काय झाले हे माहीत आहे, परंतु तरीही तुम्ही सांगा प्रचारात काय अडचणी आल्या असा प्रश्नही त्यांनी केला. उमेदवार योग्य होता काय, समन्वय कसा होता, असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी गोपनीय भेटींमध्ये केल्याने अनेकांनी उघडपणे महापौर आणि अन्य पदाधिकार्‍यांच्या कामगिरीवर टीका केली. या सर्व मुद्यांची नोंद राज ठाकरे यांनी स्वत: लेखी करून घेतली.

Web Title: Prior to Lok Sabha elections, Raj Thackeray is preparing for the state assembly elections: Panchnikham performance of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.