इंद्रकुंडावरील जुगार अड्ड्यावर छापा
By Admin | Updated: May 9, 2017 16:58 IST2017-05-09T16:58:10+5:302017-05-09T16:58:10+5:30
इंद्रकुंडावरील जुगार अड्ड्यावर छापा

इंद्रकुंडावरील जुगार अड्ड्यावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़८) सायंकाळी इंद्रकुंड परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जुगारींना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ इंद्रकुंड परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित भगवान माळी, प्रमोद गायकवाड, सलीम शेख हे तिघे वरळी मेन नावाचा जुगार खेळत होते़ या तिघांवरही पंचवटी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़