पळसे येथील जुगार अड्ड्यावर छापा

By Admin | Updated: July 24, 2016 01:35 IST2016-07-23T23:42:45+5:302016-07-24T01:35:37+5:30

पळसे येथील जुगार अड्ड्यावर छापा

Printed at the betting spot at Palsa | पळसे येथील जुगार अड्ड्यावर छापा

पळसे येथील जुगार अड्ड्यावर छापा

नाशिकरोड : पळसे परिसरातील शाळेच्या मैदानातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी शनिवारी (दि़२३) सायंकाळी छापा टाकून दहा जुगाऱ्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवजही जप्त केला आहे़
संत जनार्दन स्वामीनगरमधील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात असलेल्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकण्यात आला़ पोलिसांनी या जुगाऱ्यांकडील मोबाइल, दुचाकी तसेच रोख रक्कम असा दोन लाख १७ हजार २१० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़ दरम्यान, शिंदे गावातील एका अवैध दारूदुकानावरही पोलिसांनी छापा टाकून चार हजार ८९० रुपये किमतीच्या ३३ देशी, तर २७ विदेशी मद्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत़ याप्रकरणी संशयित किशोर भगवान वालजरे, देवीदास कचरू साळवे, संजय शंकर शेलार यांना अटक करण्यात आली आहे़

Web Title: Printed at the betting spot at Palsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.