मटका अड्ड्यावर छापा; बारा ताब्यात

By Admin | Updated: May 9, 2016 00:23 IST2016-05-08T23:16:15+5:302016-05-09T00:23:01+5:30

मटका अड्ड्यावर छापा; बारा ताब्यात

Print In possession of twelve | मटका अड्ड्यावर छापा; बारा ताब्यात

मटका अड्ड्यावर छापा; बारा ताब्यात

पेठरोड : दहा हजारांचा मुद्देमाल जप्तपंचवटी : पेठरोड परिसरातील वाचनालयाजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकून मटका खेळणाऱ्या तब्बल बारा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या संशयितांकडून जवळपास दहा हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी दुपारी चार वाजता पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पेठरोड परिसरात असलेल्या एका वाचनालयाच्या तळमजल्यावर काही संशयित मटका खेळत असल्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना मिळताच त्यांच्या आदेशानुसार गुन्हा शोध पथकाने पेठरोडला छापा टाकला त्यावेळी तब्बल बारा संशयित मटक्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे दहा हजार रुपयांची रोकड मिळाली.
पोलिसांनी या सर्वच संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Print In possession of twelve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.