कॉलेजरोडवरील हुक्का पार्लरवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:24 IST2017-10-18T00:24:49+5:302017-10-18T00:24:55+5:30
कॉलेजरोड परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ तसेच गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के .डी़ पाटील यांनी छापा टाकला़ या हुक्का पार्लरच्या मालकास ताब्यात घेण्यात आले असून, पार्लरमधून विविध स्वादाचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत़

कॉलेजरोडवरील हुक्का पार्लरवर छापा
नाशिक : कॉलेजरोड परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ तसेच गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के .डी़ पाटील यांनी छापा टाकला़ या हुक्का पार्लरच्या मालकास ताब्यात घेण्यात आले असून, पार्लरमधून विविध स्वादाचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत़ कॉलेजरोडवरील थत्तेनगर परिसरातील कृष्णा कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर अवैध हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार मंगळवारी (दि़ १७) रात्रीच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकण्यात आला़ संशयित सानी सारीफ शेख (२८, प्लॉट नंबर १, बिओ पॉइंट अपार्टमेंट, शिंगाडा तलाव) हा ‘ओ झोन हुक्का पार्लर’ या नावाने अवैधरीत्या हुक्का पार्लरचा व्यवसाय करीत होता़ या ठिकाणाहून १२ हजार २०० रुपयांच्या तंबाखूजन्य पदार्थांचे वेगवेगळे फ्लेवर असलेल्या डब्यांचा साठा व इतर पदार्थ जप्त करण्यात आले आहेत़ संशयित शेखविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात कोफ्ता अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, गंगापूर पोलीस ठाणे हद्दीबरोबरच अंबड पोलीस ठाणे हद्दीतही पोलिसांनी छापेमारी केली आहे़