हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा

By Admin | Updated: August 3, 2014 01:57 IST2014-08-03T01:49:48+5:302014-08-03T01:57:55+5:30

हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा

Print on the hotel's filth | हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा

हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा

 

नाशिक : महिलेस वेश्याव्यवसायास प्रवृत्त करून तिच्या कमाईवर उपजीविका करणाऱ्या तिघांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांनाही अटक करण्यात आली आहे़
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संत्रे यांनी गुरुवारी रात्री ९.३०वाजेच्या सुमारास चेतनानगर येथील हॉटेल कशिश पॅलेसवर छापा टाकला़ त्यावेळी रूम नंबर १०२ मध्ये एक महिला आढळून आली होती़ पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने संशयित समीर शंकर जाधव (२९), अमरिशकुमार मिश्रा (३७, दोघेही रा़ हॉटेल कशिश पॅलेस, चेतनानगर) व मुक्ताबाई साहेबराव केदार (४०, सुभद्रा अपार्टमेंट, चंदनवाडी, देवळालीगाव) या तिघांनी इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसायास प्रवृत्त करून आपली कमाई घेत असल्याने सांगितले़
या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक संत्रे यांना दिलेल्या फि र्यादीनुसार या तिघाही संशयितांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भगत करीत आहेत़ या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Print on the hotel's filth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.