दिंडोरीत हॉटेलवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:32 PM2020-03-26T23:32:46+5:302020-03-26T23:33:03+5:30

गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल बैठकवर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ६४१ रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त केला आहे.

Print hotel in Dindori | दिंडोरीत हॉटेलवर छापा

दिंडोरीत हॉटेलवर छापा

Next

दिंडोरी : तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल बैठकवर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ६४१ रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन असताना पेठ व दिंडोरी तालुक्यातील व्यावसायिक खुलेआम बेकायदेशीररीत्या मद्य विक्री करत असल्याने पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पथकाने ही धडक कारवाई केली.

Web Title: Print hotel in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.