महापालिका शाळेतील जुगार अड्ड्यावर छापा
By Admin | Updated: June 9, 2017 18:28 IST2017-06-09T18:28:01+5:302017-06-09T18:28:01+5:30
पंचशीलनगरमधील महापालिका शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या चौघा जुगाऱ्यांना भद्रकाली पोलिसांनी बुधवारी (दि़७) रात्री छापा टाकून ताब्यात घेतले़

महापालिका शाळेतील जुगार अड्ड्यावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंचशीलनगरमधील महापालिका शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या चौघा जुगाऱ्यांना भद्रकाली पोलिसांनी बुधवारी (दि़७) रात्री छापा टाकून ताब्यात घेतले़ या जुगाऱ्यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
पंचशीलनगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक सहाच्या आवारात काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता संशयित बाळा गणपत जाधव, मोसिन शाबिर शेख, सिराज रफिक शेख व कलाल रफिक शेख (रा.सर्व पंचशीलनगर,गंजमाळ ) हे अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौघांकडून ६६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
दरम्यान, भद्रकाली पोलिसांनी या चौघांवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.