बर्डीपाडा येथे जुगार अड्ड्यावर छापा
By Admin | Updated: July 24, 2014 01:01 IST2014-07-23T23:21:56+5:302014-07-24T01:01:35+5:30
कारवाई : १४ संशयित ताब्यात

बर्डीपाडा येथे जुगार अड्ड्यावर छापा
बर्डीपाडा येथे जुगार अड्ड्यावर छापा कारवाई : १४ संशयित ताब्यात सुरगाणा : गुजरात व महाराष्ट्र सीमेनजीक असलेल्या बर्डीपाडा (ता. सुरगाणा) गावाजवळ रात्रीच्या वेळी सुरूअसलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने छापा टाकून रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी गुजरातमधील १४ जणांना ताब्यात घेतले आहे.
गुजरात-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बर्डीपाडा (ता. सुरगाणा) जवळ एका ठिकाणी जुगार सुरूअसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलीस निरीक्षक सुरेश पारधी, कळवणचे पोलीस निरीक्षक एम. एस. गावित, अभोण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.
गुजरातमधील रहिवासी
व चांगल्या घरातील असलेले काही लोक जुगार खेळत असल्याचे
दिसून आले. त्यामध्ये काही युवकांचाही समावेश आहे. यावेळी रोख ७४ हजार ८० रुपये, १५ हजार रुपये किमतीचे ११ मोबाइल,
पत्त्याचे कॅट, प्लॅस्टिकचे क्वाइन, ५ लाख रुपये किंमत असलेली एक तवेरा कार व तीन लाख रुपये किमतीची एक कार, असा
एकूण आठ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ४ वे ५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश पारधी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)