लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : रमजान पुऱ्यातील खडकीरोड, द्याने शिवार भागात रईस बकरी यांच्या कारखान्यातील कार्यालयात रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून पत्त्याच्या कॅटवर हार-जीत नावाचा जुगार खेळणाऱ्या दहा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व तीन दुचाकीसह ७३ हजार ६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी बिपीन ठाकूर यांनी फिर्याद दिली. शेख शब्बीर शमसुद्दीन रा. गट नं. १७०, बालाशेठ कम्पाउण्ड, युसुफ खान समसूद खान (४८) रा. हिरापन्ना कॉलनी, अब्दुल रशीद शेख अहमद शाकीर (५०) रा. निहालनगर, अजीजखान शेरखान (६५) रा. हिंगलाजनगर, अब्दुल कलाम अ. अजीज (४८) रा. राहुलनगर, शेख याकुब शेख मोहंमद (५५) रा. सलीमनगर, मोहंमद याकूब मोहंमद मुनीर (४९) रा. निहालनगर, मुश्ताक अहमद मोहंमद बक्श (४५) रा. रमजानपुरा, अब्दुल रहेमान बद्रुद्दीन (२६) रा. सलीमनगर ग. नं. ४, शेख रईस शेख मुसा ऊर्फ रईस बकरी (४५) रा. सलीमनगर ग. नं. ३ या दहा जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून आठ हजार १५ रुपयांची रोकड, ६५ हजारांच्या तीन दुचाकी व पत्त्याचा कॅट असा ७३ हजार ६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक दिनेश पवार करीत आहेत.
जुगार अड्ड्यावर छापा
By admin | Updated: July 5, 2017 00:02 IST