बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा
By Admin | Updated: February 13, 2017 00:35 IST2017-02-13T00:35:28+5:302017-02-13T00:35:38+5:30
बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा

बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायको सर्कलजवळील सुयश अपार्टमेंटमधील एका सदनिकेत सुरू असलेल्या मद्यनिर्मिती कारखान्यावर शनिवारी (दि़११) रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी या ठिकाणाहून गावठी दारू, मद्यनिर्मितीसाठीचे साहित्य व स्कोडा कार असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़
मायको सर्कल परिसरात एका ठिकाणी बनावट गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांना मिळाली होती़ त्यानुसार रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील मायको सर्कलच्या सिबल फर्निचरजवळ असलेल्या सुयश अपार्टमेंटमधील सदनिकेवर छापा टाकला़ या ठिकाणी सुमारे अडीच लाखांची गावठी दारू, दारू बनविण्याचे साहित्य, दारूच्या बाटल्या, खोके असे साहित्य आढळून आले़ (प्रतिनिधी)