कळवणला आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर छापा
By Admin | Updated: July 8, 2017 00:02 IST2017-07-08T00:02:35+5:302017-07-08T00:02:50+5:30
कळवण : साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट दाखले हस्तगत करण्यात आले.

कळवणला आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : शहरातील एसटी बसस्थानक परिसरात सबस्टेशन रोडवरील साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर विविध दाखले व शासकीय दस्तावेज तयार करून देण्याचा गोरख धंदा सुरु असल्याची तक्रार करण्यात आल्याने पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट दाखले हस्तगत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
कळवणच्या एका तक्र ारदारासह महसूल कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार कळवण पोलिसांनी साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर सकाळी ११ वाजता छापा टाकून कारवाई केली. आॅनलाइन सेंटर चालकासह तीन जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अनेक बनावट कागदपत्रे आढळून आले. तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे कळवण शहरात खोटे दाखले देण्याचे रॅकेट कार्यरत असल्याची लेखी तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार तहसीलदार कैलास चावडे यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुपते व पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या पथकाने सकाळी ११ वाजेच्या सुमारास साई आॅनलाइन सर्व्हिस सेंटरवर छापा टाकला.
बनावट उत्पन्नाचे दाखले, डोमेसाइल , जातीचे दाखले, रेशन कार्ड, नॅशनलीटी, जेष्ठ नागरिक कार्ड, रबरी शिक्के व शासकीय कागदपत्रे ताब्यात घेतली. यावेळी आॅनलाईन सेंटरचा संचालक कैलास चौरे सह तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते