शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भद्रकालीतील व्हिडीओ पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 16:42 IST

नाशिक : भद्रकाली परिसरातील रेडलाईट परिसरातील व्हिडीओ पार्लरवर गुरुवारी (दि़३०) पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अश्लिल चित्रपट दाखविणाऱ्या एका व्हिडीओ चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देसिडकोत वृक्षांची अवैध कत्तल  नांदूरनाक्यावरील इसमाची आत्महत्या

नाशिक : भद्रकाली परिसरातील रेडलाईट परिसरातील व्हिडीओ पार्लरवर गुरुवारी (दि़३०) पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अश्लिल चित्रपट दाखविणाऱ्या एका व्हिडीओ चालकाविरू ध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़साईराज व्हिडीओ पार्लरमध्ये अश्लिल चित्रपट दाखविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता व्हिडीओ हॉलमध्ये बेकायदेशीर अश्लिल चित्रपट सुरू होता. याप्रकरणी व्हिडीओ चालक निहाल गुलाब सय्यद (रा.काझीगडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सिडकोत वृक्षांची अवैध कत्तलनाशिक : सिडकोतील दिव्या अ‍ॅडलॅब्ज व लक्ष्मी मंगल कार्यालयातील विविध प्रजातींची सात झाडांची अवैध कत्तल केल्याची घटना घडली आहे़ हिरावाडी येथील प्रकाश चौकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिडकोच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये असलेल्या पाटीलनगरमधील मृत्युंजय महादेव मंदिराच्या बाजूच्या आवारातील काशिद , गुलमोहर, रेन ट्री, आंबा व नारळ या झाडांची कत्तल करण्यात आली आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूरनाक्यावरील इसमाची आत्महत्यानाशिक : पाठीच्या व मणक्याच्या सततच्या आजारपणास कंटाळलेल्या ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ ३०) औरंगाबाद रोडवरील नांदूर नाक्यावर असलेल्या गणपतनगरमध्ये घडली़ दिलीप शिवराम गायकवाड (रा. कापसे गल्ली, गणपतनगर, नांदूर नाका) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप गायकवाड यांनी घरातील छताच्या अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ पोलिसांनी गायकवाड यांची झडती घेतली असता त्यांच्या टी-शर्टच्या खिशात चिठ्ठी आढळून आली़ या चिठ्ठीमध्ये त्यांनी पाठीच्या व मणक्याच्या तसेच इतर आजारांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. मी स्वत:हून आत्महत्या करीत असून, कोणासही जबाबदार धरू नये, असेही त्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस