संसरी सरपंचपदी युवराज गोडसे
By Admin | Updated: April 10, 2016 21:51 IST2016-04-10T21:47:07+5:302016-04-10T21:51:20+5:30
संसरी सरपंचपदी युवराज गोडसे

संसरी सरपंचपदी युवराज गोडसे
देवळाली कॅम्प : संसरी ग्रामपंचायत सरपंचपदी युवराज गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संसरी ग्रामपंचायत सरपंच पदाचा निर्मला गोडसे यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डी. एम. शेलूकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. बैठकीस उपसरपंच अनिल गोडसे, निर्मला गोडसे, संजय गोडसे, कांताबाई गोडसे, अंजना गोडसे, सुनीता गाडेकर, संजना गुंबाडे, कैलास गायकवाड, विनोद गोडसे, सविता गोडसे, संध्या कटारे, विनोद गोडसे, तलाठी पी. टी. गोतिसे, वाय. डी. भोसले, ग्रामविकास अधिकारी एस. एस. गायकवाड उपस्थित होते. माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या हस्ते नूतन सरपंच युवराज गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, संसरी विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष डॉ. शिवराम गोडसे व उपाध्यक्षपदी रघुनाथ गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. शिवराम गोडसे व उपाध्यक्षपदी रघुनाथ गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीला काशीनाथ मोजाड, सुधाकर गोडसे, कचरू गोडसे, सुमन गोडसे, मंदाबाई गोडसे, संतोष कडाळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)