पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी साकडे घालण्याचा निर्णय
By Admin | Updated: April 5, 2015 01:00 IST2015-04-05T00:59:28+5:302015-04-05T01:00:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी साकडे घालण्याचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी साकडे घालण्याचा निर्णय
नाशिक : कुंभमेळा अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपला असताना देखील गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडलेली नाही. नाशिक महापालिका गोदावरी स्वच्छतेच्या प्रयत्नात अयशस्वी ठरत असल्याचे दिसत असल्याने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासाठी साकडे घालण्याचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित केलेल्या ‘निर्मल गोदा अभियान बैठकी’त घेण्यात आला.
गोदावरी नदीत गटारीचे पाणी सोडले जाते हा आहे. शहरवासीयांनी अनेकदा नाशिक महानगरपालिकेला मागणी करूनदेखील त्यावर कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. हे काम पालिकेच्या क्षमतेबाहेरचे असून, आता गोदावरी स्वच्छतेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घालणे योग्य आहे, असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगबीर सिंग यांनी सांगितले.
गोदाप्रेमी नागरिकांनी निर्मल गोदा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सिद्धेश थोरात, प्रभाकर दाते, सनविवि फाउंडेशनचे धीरज बच्छाव, राजू आचार्य, साकेत देशपांडे, नितीन शुक्ल आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)