शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी केलं नाशिकच्या मयूर पाटीलचं भरभरून कौतुक, 'हे' आहे खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 15:38 IST

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २८) राष्ट्राला संबोधून केलेल्या ‘मन की बात’च्या ८३ व्या भागात नाशिकचा ...

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २८) राष्ट्राला संबोधून केलेल्या ‘मन की बात’च्या ८३ व्या भागात नाशिकचा युवक मयूर पाटील याने त्याच्या सहकाऱ्यांसह प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

खुद्द पंतप्रधानांनी मयूरच्या कार्याची दखल घेतल्याने ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला असता त्याने आपल्या कल्पनेची माहिती दिली. कॉलेजमध्ये असताना तो दुचाकी वापरत होता. तिची सरासरी (मायलेज) अत्यंत कमी होते आणि उत्सर्जन खूप जास्त होते. ती दोन स्ट्रोक मोटारसायकल होती. उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि मायलेज वाढविण्यासाठी, मयूरने प्रयत्न सुरू केले. २०११-१२ मध्ये त्याने सुमारे ६२ किलोमीटर प्रति लीटरने मायलेज वाढवले. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास बळावला व काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.

नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील नवरचना शाळेतून मयूरने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मालेगाव येथील केबीएच पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या पदवीचे शिक्षण त्याने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केले आहे. मयूर पुढे म्हणाला, आम्ही स्टार्ट-अप इंडिया अंतर्गत नोंदणीकृत आहोत. आम्हाला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि सांगण्यात आले की पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे, त्यांना तुमच्या उद्योगाबद्दल जाणून घ्यायचे आहे. मी कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे सेकंड हँड मोटारसायकल होती, तिचे मायलेज खूप कमी होते आणि प्रदूषणाची पातळी जास्त होती. मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी या नात्याने मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरविले. मी दुचाकीचे इंजीन उघडले आणि त्यावर काम केले, नंतर मला कळले की दुचाकीचे मायलेज २०-२५ किलोमीटरवरून ४० किलोमीटर झाले आहे. त्यामुळे आणखी मायलेज कसे वाढवता येईल यावर त्याने संशोधन सुरू केले. मयूरच्या मते पूर्वी कार्बोरेटेड वाहने होती, आता फ्युएल इंजेक्टेड वाहने आहेत. कोणत्याही ज्वलनासाठी हवा, इंधन आणि स्पार्क या तीन गोष्टींची आवश्यकता असते. हे ओळखून त्याने हवेतील घटकांवर संशोधन सुरू केले जे ऑप्टिमाइझ किंवा ऑटोमाइज केले जाऊ शकतात. जवळपास सात वर्षांनंतर कल्पना अमलात आणण्यात तो यशस्वी झाला. २०१८ मध्ये त्याने प्रादेशिक परिवहन महामंडळात पायलट प्रोजेक्ट केला. उत्पादन प्रकल्पासाठी गुंतवणूकदार शोधत आहेत. सध्या मोटारसायकल, ट्रक आणि बसचे फिल्टर तयार करण्यास तो सक्षम आहे. सर्व प्रकारच्या मॉडेल्सची पूर्तता करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असे मयूर म्हणाला.

उत्तम कल्पना निर्माण करण्यासाठी फक्त एक छोटीशी ठिणगी लागते. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही असे कोणी म्हणत असेल, तर ती प्रेरणा असू शकते. कुटुंबाच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय एखादी गोष्ट साध्य करता येत नाही. चांगली नोकरी मिळवण्याचा पारंपरिक मार्ग सोडून वेगळा मार्ग शोधावा.

- मयूर पाटील

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिक