प्राथमिक शिक्षक खैरनार यांना राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 03:47 PM2020-10-07T15:47:51+5:302020-10-07T15:47:51+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील मोरेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांना नुकताच राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला. बागलाण पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.

Primary teacher Khairnar awarded National Innovation Award | प्राथमिक शिक्षक खैरनार यांना राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर

प्राथमिक शिक्षक खैरनार यांना राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर

Next
ठळक मुद्दे डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात येणार

सटाणा : बागलाण तालुक्यातील मोरेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांना नुकताच राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला. बागलाण पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.
खैरनार यांनी विद्यार्थ्यांना गणित विषय अधिकाधिक मनोरंजक आणि आनंददायी होण्यासाठी आधार कार्ड आमचा मित्र हा नवोपक्र म शाळेत यशस्वीपणे राबवून भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन अहमदाबाद, स्टेट इनोव्हेशन आॅफ रिसर्च फौंडेशन (सर फौंडेशन ) सोलापूर तसेच शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या एज्युकेशन इनोव्हेशन बँक या प्रकल्पाअंतर्गत खैरनार यांच्या नवोपक्र माची निवड होऊन त्यांना डिसेंबर महिन्यात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
(फोटो ०५ सटाणा)
सोपान खैरनार यांचा सत्कार करतांना बागलाणचे गटविकास अधिकारी पि. एस. कोल्हे, समवेत यशवंत कापडणीस.

Web Title: Primary teacher Khairnar awarded National Innovation Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.