शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्राथमिक विद्यालय : पिण्याच्या पाण्यात डेंग्यूसदृश अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:20 IST

मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्याने शाळेला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

सिडको : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्याने शाळेला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.महापालिकेच्या सिडको मलेरिया विभागाच्या वतीने सोमवारी (दि.११) सकाळी संपूर्ण ताफ्यासह पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  सिडको भागात महापालिकेच्या तसेच खासगी शाळांची संख्या अधिक असून, या शाळांमध्ये पाच वर्षे वयोगटापासून मुले शिक्षण घेत आहे. सिडकोतील मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालय असून, या विद्यालयात सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत शाळा भरत असून, या शाळेत असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्या या गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ केल्या नसल्याचे मनपाच्या मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या आदेशान्वये पिण्याच्या पाण्या साफ कराव्यात याबाबत शाळेला दोन वेळीस नोटीस दिल्या होत्या, परंतु यानंतरही शाळेने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सोमवारी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी त्यांच्या टिमने अचानक शाळेत पाहणी केली. यावेळी शाळेच्या गच्चीवर ठेवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्यात डेंग्यूसदृश आजारांच्या अळ्या आढळून आल्या. तसेच शाळेच्या आवारात असलेल्या सेफ्टी टॅँकवर असेलेला ढापा तुटलेला आढळून आला असून, यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले असून, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाने सर्व पाहणी केल्यानंतर शाळेला तत्काळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, पाणीपुरवठ्यांच्या टाक्या त्वरित स्वच्छ करण्याची तंबी शाळा व्यवस्थापकांना दिली.

टॅग्स :SchoolशाळाWaterपाणीdengueडेंग्यू