त्र्यंबकेश्वर : सोमवारी (दि. ६) झालेल्या पुरोहितांच्या दोन गटातील हाणामारीपर्यंत पोहोचलेले प्रकरण पोलिसांकडून अद्याप चार्जशिट न्यायालयात दाखल न झाल्याने संशयित ११ आरोपींसंदर्भात चार्जशिट दाखल झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्र्यंबक पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम १६० नुसार सर्वच्या सर्व संशयिताना चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी यापूर्वीच जामिनावर सोडले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून समजले की, येत्या २/३ दिवसांत आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. त्यानंतर सर्वांना बोलावून न्यायालयात हजर करण्यात येईल. ज्या तपासी अंमलदाराकडे सदर प्रकरणाची फाईल आहे ते अचानक आजारी झाल्यानेही आरोपपत्रास उशीर होत असल्याचेही समजले. (वार्ताहर)विशेष म्हणजे या सर्वांना (दि. ८) न्यायालयात दाखल करावयाचे होते. तथापि, अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आरोपपत्र दाखल होऊ शकले नसल्याचे स्पष्टीकरणही पोलीस निरीक्षकांनी दिले. (वार्ताहर)
पुरोहित हाणामारी; सर्वांना जामीन
By admin | Updated: October 9, 2014 01:09 IST