निरीक्षणगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By Admin | Updated: July 2, 2014 00:19 IST2014-07-01T22:41:51+5:302014-07-02T00:19:56+5:30

निरीक्षणगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Pride of Honorary Students in the Observation House | निरीक्षणगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

निरीक्षणगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 

नाशिक : मागासवर्गीय विक्रीकर अधिकारी, कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने निरीक्षणगृहातील पाचवी ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर विक्रीकर एस. पी. काले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विक्रीकर उपआयुक्त डॉ. एन. टी. डाके, दीपक वैष्णव, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह उपस्थित होते.
यावेळी काले म्हणाले, निरीक्षणगृहातील विद्यार्थीवर्ग हा समाजाच्या दृष्टिकोनातून उपेक्षित वर्ग आहे; परंतु या वर्गातील गुणवंत विद्यार्थी हे भावी समाजाचे आधारस्तंभ आहेत. अविनाश अहेर यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर लांडगे, चंद्रकांत बोंबले, जगदीश पावडे, स्नेहल ठाकूर, व्ही. एन. गांगुर्डे, विजय दास्ताने, शकीनाथ पवार, सुनीता आव्हाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Pride of Honorary Students in the Observation House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.