भाव काहीसे उतरले
By Admin | Updated: July 16, 2016 00:24 IST2016-07-16T00:19:25+5:302016-07-16T00:24:32+5:30
बाजार समित्यांचे व्यवहार सुरू

भाव काहीसे उतरले
भाग्यश्री मुळे ल्ल नाशिक
बाजार समित्यांचा संप संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाज्या बाजारात दाखल झाल्या असून, आवक वाढल्याने भाज्यांचे दर थोडे कमी झाले असून गेल्या पाच महिन्यांपासून चढ्या भावाने भाज्या खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. बाजार समित्यांचे व्यवहार बंद होते तेव्हा काही प्रमाणात शेतकऱ्यांनी स्वत:हून भाज्या विकण्याचा प्रयत्न केला, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भाज्या शेतातच ठेवल्या होत्या. आता भाव उतरल्याने गृहिणींनी याबाबत समाधान व्यक्त केले असून, भाव आणखी कमी होण्याची अपेक्षा केली आहे.