उन्हाळं कांदा रोपांना आला सोन्याचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 18:08 IST2019-11-24T18:07:51+5:302019-11-24T18:08:07+5:30
जळगाव नेऊर.. परतीच्या पावसाने शेतकर्यांचे लाल कांदा व रोपांचे नुकसान झालेले असतानाच ,उन्हाळं कांद्याचे रोपेही सडुन गेल्याने उन्हाळं कांद्याच्या ...

उन्हाळ कांद्याचे रोप.
जळगाव नेऊर.. परतीच्या पावसाने शेतकर्यांचे लाल कांदा व रोपांचे नुकसान झालेले असतानाच ,उन्हाळं कांद्याचे रोपेही सडुन गेल्याने उन्हाळं कांद्याच्या लागवडीवर परिणाम होत आहे ,त्यातच उन्हाळं कांद्याने आठ हजाराचा टप्पा ओलांडल्याने साहजिकच शेतकरी हि उन्हाळं कांद्याच्या लागवडीसाठी उन्हाळं कांद्याच्या रोपांची शोधाशोध करत असुन मोठ्या प्रमाणावर रोपच खराब झालेली असतानाच किंचितच मुरमाड जमिनीवर रोपे वाचलेली रोपे ही सोन्याच्या भावात विक्र ी होत आहे,एक एकर कांदा रोपांसाठी तीस ते पस्तीस हजाराचा भाव फुटल्याने म्हणजे सोन्याच्या भावात रोपांची किमती झाल्याने शेतकरी कांदा रोपांसाठी भटकंती करत आहेत.
मिहनाभर पाऊस लांबल्याने शेतकर्यांच्या शेतात टाकलेले कांदा बियाणे पाणी साचल्याने सडून गेले,तर काही शेतकर्यांना पावसामुळे कांदा बियाणे टाकताच न आल्याने जमीन पडीक राहिल्या आहेत.
तर काही शेतकर्यांनी पाऊस उघडल्यावर कांदा बियाणे टाकल्याने साहजिकच कांदा लागवड उशिरा होणार आहे.
********
कांदा रोपे नसल्याने गहू क्षेत्रात वाढ
मिहनाभर लांबलेल्या पावसाने कांदा रोपे खराब झाल्याने गहू क्षेत्रात वाढ झाली , तर काही शेतकर्यांनी हरभरा पिकावर भर दिला आहे,एकुणच कांद्याच्या आगारात शेतकर्यांना रोपांऐवजी इतर पिकांकडे वळण्याची वेळ आल्याने लेट उन्हाळं कांदा लागवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
****
मोजक्याच शेतकर्यांना मिळाला भाव
आज उन्हाळं कांद्याला मिळत असलेला भाव शेतकर्यांना फक्त ऐकण्याची वेळ आली आहे,कारण मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना कांदा साठवणूक केली, पण कांदा तीन हजारांवर गेल्यावर भाव परत खाली येत, तोच कांदा दोनशे ते तीनशे रु पयांनी विकावा लागल्याने शेतकर्यांनी यावर्षी मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरवातीलाच विकुन टाकला. त्यामुळे मोजक्याच शेतकर्यांना आठ हजाराचे भाव बघायला मिळत आहे.