नाशिक : जुने नाशिक भागातील कोळीवाडा, जुना कथडा परिसरात एका अठरा वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्रकार दोन दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी मयत तरुणीच्या प्रियकरासह तिच्या नव्या प्रेयसीविरुध्द भद्रकाली पोलिसांनी आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुने नाशिकमधील कोळीवाडा येथे राहणाऱ्या प्रिया ऊर्फप्रियंका राजू पवार हिने रविवारी (दि.३) दुपारी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. यावेळी पोलिसांना तीच्या राहत्या घरातून डायरी मिळून आली होती. या डायरीमध्ये प्रेमभंगाचे कारण तिने नमुद केले होते. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असता. तिचे वडील फिर्यादी राजू दत्तू पवार (४३) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रियकर उमेश शिवाजी पिंगळे (रा. कोळीवाडा) व नव्या प्रेयसीविरुध्द आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली. उमेश याने फिर्यादीच्या मुलीस प्रेमाचे आमीष दाखवून तिची फसवणूक केली. त्यानंतर उमेशने त्याच्या नवी प्रेयसी संशयित साक्षी पगारे यांनी आपआपसांत संगनमत करून प्रेमसंबंध प्रस्थापित करून प्रिया हिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोघा प्रियकर व प्रेयसीविरुध्द फि र्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पुढील तपास सुरू आहे.
प्रेमभंगामुळे प्रेयसीची आत्महत्त्या; प्रियकरासह नव्या प्रेयसीविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:40 IST