कळवण : जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. कळवण पोलिसांच्या गस्तीपथकाने सप्तशृंग गडावरील नागरिकांच्या मदतीने दोघा संशयितांना पकडले. वाहन चालक फरार झाला आहे.मंगळवारी रात्री कळवण पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना नाशिक येथील पोलीस नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश आला. त्यानुसार संबंधित वणी पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. चालकाने गाडी सप्तशृंगी गडाकडे वळविली. वेगाने पळून जाण्याच्या नादात गडावरील प्रसादाच्या दुकानाला गाडीने ठोस दिली. जोरदार आवाज झाल्याने रहिवाशी जागे झाले असता त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. या गाडीत दहा जनावरे बांधून ठेवली होती. गाडीत बसलेल्या अन्य दोघांना नागरिकांनी चोप देत पाठलाग करीत आलेल्या कळवण पोलिसांच्या ताब्यात दिले. इकबाल अहमद अब्दुल रशीद रा. नुरानी नगर, मालेगाव व शेख जाकीर शेख जाबीर, रा. आझाद नगर मालेगाव यांना अटक करून त्यांच्या जवळून मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस नाईक एन. एन. अहिरे यांच्या फिर्यादीवरून प्राणी संरक्षक कायद्यान्वये कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायत कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन दिंडोरी : ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढाकणे सरचिटणीस उज्ज्वल गांगुर्डे यांचे नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी आर.झेड. मोहिते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधारित वेतनवाढ लागू करा, हंगामी कर्मचार्यांना कायम कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळावे आदि मागण्या करण्यात आल्या.(वार्ताहर)संघटनेचेबाळासाहेब ढाकणे यांनी सांगितले यावेळी भाऊराव उफाडे, सचिन जाधव, भरतकापसे, सचिन बोरस्ते, राजेंद्र गायकवाड , उल्हास बोरस्ते, सुधाकरचारोस्कर, हर्षल बोरस्ते, संपात शार्दुल,संतोष पगारे, रमेश सोनवणे, दीपकसोलंकी, आदींसह दोनशे कर्मचारी उपस्थित होते,