शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 01:35 IST

पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात खैराची अवैध वाहतूक रोखली. तोडलेल्या लाकूडसाठ्यासह गुजरातची तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

ठळक मुद्देउंबरठाण वनपरिक्षेत्र : पांगारणे शिवारात गुजरातची तीन वाहने ताब्यात

नाशिक : पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात खैराची अवैध वाहतूक रोखली. तोडलेल्या लाकूडसाठ्यासह गुजरातची तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच्या सीमेला लागून आहे. यामुळे सातत्याने दऱ्याखोऱ्यातील चोरट्या वाटेने तस्कर टोळ्या घुसखोरी करतात. काही दिवसांपूर्वीच नाशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुजरात वनविभागाच्या सापुतारा, डांग, कपराडा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांसोबत ‘बॉर्डर मीटिंग’ घेत जंगलतोड करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी एकमेकांना संयुक्तरीत्या मदत करत ‘ॲक्शन प्लॅन’ राबिवण्याचा निर्धार केला. या बैठकीला आठवडा होत नाही, तोच उंबरठाण वनपरिक्षेत्रात तस्करांनी घुसखोरी करत खैराच्या झाडांवर घाव घातला. तोडलेला खैर गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा मनसुबा वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व त्यांच्या पथकाने उधळून लावला. चोखपणे रात्रीची गस्त घालत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून शिताफीने अवैधरीत्या खैर वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या वाहनांना ‘ब्रेक’ लावला. पथकाने मौजे पांगारणे शिवारात पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या भरधाव जाणारी मॅक्स जीप (जीजे ०६ बीए६१३८), दोन क्वालिस कार (जीजे२१ ५९६४) व (जीजे१९ ए ४४१४) राेखल्या. या वाहनांमधून सहा हजार ८६२ रुपये किमतीचे  खैराचे एकूण १७ नग जप्त करण्यात आले. तसेच तीनही वाहनांसह सुमारे २ लाख ७६ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या पथकाने या कारवाईत जप्त केला आहे.अंधारात केला पोबारावनविभागाच्या पथकाने लावलेला सापळा लक्षात आल्यानंतर संशयित तस्करांनी वाहने भरधाव दामटवित हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात तीनही वाहने बेवारस सोडून वाहनचालकांसह त्यांच्या इतर साथीदारांनी वनविभागाच्या पाठलाग करणाऱ्या गस्ती पथकाची नजर चुकवून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. दरम्यान, सीमावर्ती गुजरात वनविभागाच्या तपासणी नाक्यांनाही याबाबत ॲलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग