मद्याची अवैध वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST2020-12-29T04:13:06+5:302020-12-29T04:13:06+5:30

राज्य उत्पादन शुल्क नाशिकच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रविवारी (दि.२७) आंबोली घाटात पहाटे सापळा रचण्यात आला. ...

Prevented illegal transportation of alcohol | मद्याची अवैध वाहतूक रोखली

मद्याची अवैध वाहतूक रोखली

राज्य उत्पादन शुल्क नाशिकच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रविवारी (दि.२७) आंबोली घाटात पहाटे सापळा रचण्यात आला. निरीक्षक सुनील देशमुख, राजेश धनवटे यांच्या पथकाने संशयास्पद येणारी मोटार (जीजे ०५ आरजे ६२७६) अडविली. या मोटारीची झडती घेतली असता, यामध्ये विदेशी मद्य चोरकप्प्यातून वाहून नेले जात असल्याचे उघडकीस आले. पथकाने संशयित मनिष नानुभाई खेनी (रा. वराछा, गुजरात) यास ताब्यात घेतले आहे.

पंजाब निर्मित व केवळ दादरा व नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेली स्कॉच विदेश दारू आढळून आली. यामध्ये ब्लॅक डॉग स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४४ बाटल्या, वॅट ६९ स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १३ बाटल्या व ब्लॅन्डर प्राइड व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ४ बाटल्या आणि मोटार असा एकूण ५ लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

-------- -----

Web Title: Prevented illegal transportation of alcohol