फळविक्रेत्याचा पूर्ववैमनस्यातून खून

By Admin | Updated: June 27, 2014 00:13 IST2014-06-26T23:55:43+5:302014-06-27T00:13:21+5:30

फळविक्रेत्याचा पूर्ववैमनस्यातून खून

The prevalence of the fruit vendor blood | फळविक्रेत्याचा पूर्ववैमनस्यातून खून

फळविक्रेत्याचा पूर्ववैमनस्यातून खून

 

नाशिकरोड : सुभाषरोड पवारवाडी रेल्वे क्वॉर्टर येथे रेल्वेत फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या धनजी वाघेला यांचा पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
सुभाषरोड पवारवाडी येथे गुजरात राज्यातील सुरतनगर बोराज येथील तीन-चार कुटुंबे गेल्या काही वर्षांपासून राहतात. ते सर्व रेल्वेस्थानक व मनमाड-इगतपुरी दरम्यान, रेल्वेत फळविक्रीचा व्यवसाय करतात. आज सकाळी सुभाषरोड रेल्वे क्वॉर्टर येथील मोकळ्या जागेत एका झाडाखाली फळविक्रेता धनजी भारू वाघेला (४०) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.
वृत्त समजताच सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वान पथकालादेखील पाचारण करण्यात आले होते. घटना स्थळावरून रक्ताने माखलेला दगड, कपडे, चपला पोलिसांनी जप्त केले होते.

Web Title: The prevalence of the fruit vendor blood