प्रवासाचा बनाव करत रिक्षा पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:57+5:302021-07-28T04:15:57+5:30
सिडको परिसरातील सावतानगर येथील प्रकाश गोटू भारती हे जिल्हा रुग्णालयाच्या रिक्षा स्टॅन्डवर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उभे होते. ...

प्रवासाचा बनाव करत रिक्षा पळविली
सिडको परिसरातील सावतानगर येथील प्रकाश गोटू भारती हे जिल्हा रुग्णालयाच्या रिक्षा स्टॅन्डवर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उभे होते. रुग्णालयातून आलेल्या एका युवकाने त्यांना जेल रोड, सैलानी बाबा चौक येथे जायचे असल्याचे सांगून मीटरप्रमाणे पैसे देण्याचे कबूल केले. सैलानी बाबा दर्ग्याच्या अलीकडे युवकाने रिक्षाचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मित्राला फोन करायचा आहे, असे सांगून भारती याचा फोन घेतला. नंतर फोनवर बोलत रिक्षाचालकाला साईबाबांचा फोटो असलेली कागदाची पुडी देत जवळील दवाखान्याजवळ ओळखीच्या व्यक्तीला देण्यास सांगितले. भारती हे दाताच्या दवाखान्याकडे गेले असता त्या चोरट्या प्रवाशाने मोबाइलसह रिक्षा (एमएच १५ एसयू ४६६६) गायब केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.