शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

चंदनचोरीसाठी दबा : आंतरराज्यीय टोळीचा एक चोरटा ताब्यात; तीघे साथीदार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 15:36 IST

‘आम्ही चौघे मिळून दिवसा चंदनाच्या झाडांची रेकी करतो व रात्रीच्या सुमारास बघितलेली चंदनाची झाडे कापून लंपास करतो’ अशी कबुली...

ठळक मुद्दे ५ महिन्यांपासून सक्रीयचौघे राहुटी ठोकून निर्जनस्थळी राहत होते.

नाशिक : चंदन चोरीच्या तयारीत असणाऱ्या चौघांच्या टोळीचा प्रयत्न इंदिरानगर बीट मार्शल पोलिसांनी हाणून पाडला. रात्रीच्या गस्त पथक व गुन्हे शोध पथकाने घेराबंदी करून आंतरराज्यीय चंदनचोरी करणाºया टोळीतील एका संशयिताला ताब्यात घेतले; मात्र अंधाराचा फायदा घेत त्याचे तीघे साथीदार निसटून जाण्यास यशस्वी ठरले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चार संशयित चोरट्यांची टोळी मोदकेश्र मंदिराच्या आवारात दबा धरून आहे अशी माहिती इंदिरानगर पोलिसांना फोनवरून मिळाली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत तत्काळ मंदिराच्या दिशेने रवाना झाले. मंदिराच्या परिसरात चोरट्यांचा शोध घेतला असता ,ते आढळले नाही; मात्र पहाटे पाच वाजेच्या सुमारास बीट मार्शल गस्त घालत असताना त्यांना चार्वाक चौकाजवळ चार इसम संशयास्पदरिता वावरतांना आढळून आले. त्यांना पोलिसांनी हटकले असता त्यांनी पळ काढला. बीट मार्शल कडाळे यांनी त्वरीत गस्तीवरील गुन्हे शोध पथक व पीटर मोबाईल वाहनाला बिनतारी संदेश यंत्रणेवरून ‘अ‍ॅलर्ट’देत पाठलाग सुरू ठेवला. दोन्ही पथकांनी त्वरित मिळालेल्या लोके शनच्या अधारे पाटील गार्डन, रथचक्र चौक, राजीवनगर रस्ता भागात सापळा रचला. यावेळी एक संशियत जिलोन सिलोन पारधी (२५,रा खैरणी, जि.जबलपूर, मध्यप्रदेश ) यास ताब्यात घेतले; मात्र त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या तावडीतून निसटले. पोलिसांनी पारधीची अधिक चौकशी केली असता ‘आम्ही चौघे मिळून दिवसा चंदनाच्या झाडांची रेकी करतो व रात्रीच्या सुमारास बघितलेली चंदनाची झाडे कापून लंपास करतो’ अशी कबुली दिली. त्याच्याकडून झाडे तोडण्याची हत्यारे करवत, कुºहाड पोलिसांनी जप्त केली आहे. काही दिवसांपुर्वीच गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पारधीच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत असून सर्वच पोलीस ठाणे व गुन्हे शाखांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. सदरची कामिगरी इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, गुन्हे शोध पथकाचे भगवान शिंदे, राऊत कडाळे, रियाज शेख यांच्या पथकाने केली.५ महिन्यांपासून सक्रीयमध्यप्रदेश येथील चौघे चंदनचोर मागील पाच महिन्यांपासून शहर व परिसरात सक्रीय असून गरवारे हाऊसमध्ये झालेल्या चंदनचोरीचा गुन्हा पारधीकडून उघडकीस आला आहे. त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीतील अन्य फरार संशयित चोरटे हाती लागल्यास विविध गुन्हे उघड होण्याची शक्यता र्वतविली जात आहे. वडाळागाव परिसरात अन्य भागात हे चौघे मोकळ्या भुखंडांवर राहुटी ठोकून निर्जनस्थळी राहत होते. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारी