अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:15 IST2020-01-03T22:14:47+5:302020-01-03T22:15:17+5:30
चांदवड तालुका जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दुगाव येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत उत्साहात संपन्न झाल्या.

दुगाव येथे जिल्हा परिषद चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नूतन सभापती पुष्पा धाकराव, उपसभापती नितीन अहेर, आत्माराम कुंभार्डे, ज्योती आहेर, विनायक सोनवणे, महेश पाटील, श्रीधर देवरे आदी.
दरेगाव : चांदवड तालुका जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दुगाव येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत उत्साहात संपन्न झाल्या.
अध्यक्षस्थानी चांदवड पंचायत समिती नूूतन सभापती पुष्पाताई धाकराव, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, पंचायत समिती सदस्य ज्योती आहेर, संस्थेचे चेअरमन विनायक सोनवणे, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीधर देवरे आदींंच्या हस्ते झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना पुढे नेण्याची आज गरज असल्याचे जिल्हा सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी सांगितले.
मागील वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेत आहोत, त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन उपसभापती नितीन आहेर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक विस्ताराधिकारी बापूराव सोनवणे यांनी केले. या स्पर्धेत दुगाव, चांदवड वडाळीभोई, वडनेरभैरव, काजी सांगवी या गटातील स्पर्धक सहभागी झाले होते.
यामध्ये वक्तृत्व, धावणे, वैयक्तिक गीत गायन समूहगीत, गायन कबड्डी, खोखो या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखविले. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी सतीश कांबळे, राजेंद्र निकम, नानासाहेब आहेर, माजी सभापती उत्तम आहेर, बाळासाहेब सोनवणे, बाबूराव सोनवणे, दुगावच्या सरपंच आरती सोनवणे, उपसरपंच मंगल गायकवाड, सदस्य प्रकाश सोनवणे, जगदीश सोनवणे, सुनील सोनवणे, राजू शिंदे, चेतन सोनवणे, देवीदास सोनवणे, अशोक डोंगे, नाना जाधव, पुंडलिक सोनवणे, सर्जेराव ठोके, दिनेश शिंदे, भाऊसाहेब निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय मोरे, सतीश पाटील, सविता भामरे, जयश्री वनवे यांनी केले. आभार दिलीप सोनवणे यांनी मानले.