पांढुर्ली सोसायटीच्या अध्यक्षपदी वाजे
By Admin | Updated: July 30, 2016 23:22 IST2016-07-30T23:11:53+5:302016-07-30T23:22:38+5:30
बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई वाजे

पांढुर्ली सोसायटीच्या अध्यक्षपदी वाजे
पांढुर्ली : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पांढुर्ली येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी वाळू शिंदे, तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई विष्णू वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या महिन्यात झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजाभाऊ वाजे समर्थकांच्या शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १० जागांवर वर्चस्व मिळविले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक घेण्यात
आली. यावेळी अध्यक्षपदासाठी शिवाजी वाजे यांनी दाखल
केलेल्या अर्जावर सूचक म्हणून चंद्रकांत गणपत वाजे, तर अनुमोदक म्हणून छगन तुकाराम पवार यांची स्वाक्षरी होती. उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मीबाई वाजे यांनी दाखल
केलेल्या अर्जावर सूचक म्हणून तानाजी नामदेव वाजे, तर अनुमोदक म्हणून शिवाजी दगडू ढोकणे यांची स्वाक्षरी होती.
दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने अध्यक्षपदी शिवाजी वाजे, तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई वाजे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. यावेळी संचालक शिवाजी दगडू ढोकणे, जगन दत्तू वाजे, सुदाम बाबूराव वाजे, प्रभाकर रावळा भालेराव, सुशीला विष्णू ढोकणे, विराम यशवंत मोगले, अरुण शंकर वाजे यांच्यासह शांताराम ढोकणे, सुकदेव वाजे, शांताराम वाजे, विष्णू वाजे, शिवराम वाजे, विनोद भालेराव, दत्तू केदार, उत्तम वाजे, कुंडलिक वाजे, शिरीष बर्वे, सदू पवार, कैलास वाजे, रवींद्र ढोकणे, विकास वाजे आदि उपस्थित होते. सचिव किरण गोसावी, क्लार्क विलास वाजे यांनी निवडणूक कामात साहाय्य केले. (वार्ताहर)