शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केले आमंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:52 PM

सटाणा/औंदाणे : श्री क्षेत्र मांगीतुंगी (ऋषभदेवपुरम्) (ता.बागलाण) येथे सोमवार (दि.२२) पासून सुरु होणाऱ्या जागतिक अहिंसा ‘विश्वशांती अहिंसा संमेलन’ महोस्तव धार्मिक कार्यक्र म निमित्त भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्यात आले असून वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रपती मांगीतुंगीला येणार असल्याची माहिती १०८ फुट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी अध्यक्ष, पिठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली.

ठळक मुद्देश्री क्षेत्र मांगीतुंगी : ‘विश्वशांती अहिंसा संमेलन’ महोस्तवास २२ पासून प्रारंभ

सटाणा/औंदाणे : श्री क्षेत्र मांगीतुंगी (ऋषभदेवपुरम्) (ता.बागलाण) येथे सोमवार (दि.२२) पासून सुरु होणाऱ्या जागतिक अहिंसा ‘विश्वशांती अहिंसा संमेलन’ महोस्तव धार्मिक कार्यक्र म निमित्त भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्यात आले असून वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रपती मांगीतुंगीला येणार असल्याची माहिती १०८ फुट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी अध्यक्ष, पिठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली.ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपती मांगीतुंगी येथे येणार असल्याचे निश्चित झाले असून जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक ज्ञानमती माता, चंदनामती माताजी, कर्मयोगी रवींद्र कीर्ती स्वामी, कार्याध्यक्ष अनिल जैन, मुख्य अधिष्ठाता सी. आर. पाटील, महामंत्री संजय पापडीवाल, डॉ. जीवन प्रकाश जैन, विजयकुमार जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गणेश गुरव यांनी ऋषभदेवपुरम येथे बैठक घेऊन सुरक्षा, मंडप, स्टेज, वाहनतळ, प्रमुख अतिथी, अधिकारी, संत, लोकप्रतिनिधी, भाविक यांची बैठक व्यवस्था, हेलीपॅड, मांगीतुंगी तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते, मैदान, वीज, दूरध्वनी, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी मुख्य विषयांबाबत चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी केली.अप्पर पोलीस अधीक्षक निलोपल, बागलाण तहसीलदार प्रमोद हिले, वनपरीक्षेत्र अधिकारी निलेश कांबळे यांनीही कार्यक्र म नियोजानाबत माहिती घेऊन संबंधित सुरक्षा विभाग, ट्रस्ट विभागाला कार्यक्र म सुरळीत पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या. या कार्यक्र मानिमित्त भारत व भारताबाहेरील जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी यांनी मांगीतुंगी तीर्थक्षेत्र व भारतातील संलग्न जैन तीर्थक्षेत्र संबंधित उपस्थित अधिकारी यांना ऐतिहासिक पुस्तके भेट देऊन आशीर्वाद दिला. यावेळी ट्रस्ट कमिटीचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते.