अलका गांगुर्डे यांना राष्ट्रपती पदक जाहीर
By Admin | Updated: January 25, 2015 23:27 IST2015-01-25T23:26:49+5:302015-01-25T23:27:04+5:30
अलका गांगुर्डे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

अलका गांगुर्डे यांना राष्ट्रपती पदक जाहीर
नाशिक : होमगार्ड व नागरी संरक्षण दलातील विशेष कार्याबद्दल जिल्हा होमगार्ड्सच्या नाशिक पथकातील वरिष्ठ पलटन नायक अलका रामचंद्र गांगुर्डे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे़
१९८६ पासून होमगार्ड सेवेत असलेल्या गांगुर्डे यांचे संघटनेतील दीर्घ सेवेचे योगदान असून, संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, राष्ट्रीय कार्य केलेले आहे़ त्यांच्या या कार्याची महासमादेशक अहमद जावेद, उपमहासमादेशक सुरिंदर कुमार यांनी दखल घेऊन राष्ट्रपती पदकाकरिता शिफारस केली़
गांगुर्डे यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी विलास पाटील, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते, होमगार्डचे जिल्हा समादेशक जितेंद्र कर्डिले यांनी अभिनंदन केले आहे़ (प्रतिनिधी)